सुकन्या समृद्धी योजना : तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली!

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारचा हा एक उपक्रम आहे , ही योजना बेटी बचाव बेटी पढाव याच्या अंतर्गत नवीन सुरुवात केली. मुलींच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीकोणातून पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली.
सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची समर्पित गुंतवणूक योजना आहे , यामध्ये तुमच्या मुलींच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक लाभ देत ला जातो. ही योजना 22 जानेवारी 2015 मध्ये सुरू केली गेली आहे , या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रामुख्याने, मुलींचे सक्षमीकरण आणि शिक्षण कल्याण, आर्थिक सुरक्षितता वाढवण्यावर ती लक्ष केंद्रित करते. या योजनेच्या माध्यमातून पालकांना मुलींच्या भविष्यासाठी पैसे बचत करण्यासाठी प्रोत्साहन देते . या बचतीच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण लग्न आणि भविष्यातील तिच्या खर्चासाठी ठराविक रक्कम मिळण्याचे एक प्रभावी साधन निर्माण झाले आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी..

तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये संपर्क करू शकता, यामध्ये मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असले पाहिजे, खाते उघडताना मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक तत्व ज्याच्याकडे असेल ते खाते उघडू शकतात.

बँक लिस्ट

नॅशनल बँक लिस्ट-

  1. स्टेट बँक ऑफ इंडिया
  2. बँक ऑफ महाराष्ट्र
  3. बँक ऑफ इंडिया
  4. बँक ऑफ बडोदा
  5. पंजाब नॅशनल बँक
  6. युको बँक
  7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  8. कॅनरा बँक

इतर बँका.

  1. आयसीआयसीआय बँक
  2. एचडीएफसी बँक
  3. ॲक्सिस बँक

भारतीय पोस्ट ऑफिस

आवश्यक कागदपत्रे

फोटो

मुलीचे आधार कार्ड

मुलीचे जन्म प्रमाणपत्र

पालकाची ओळखपत्र ( आधार कार्ड , पॅन कार्ड )

रहिवाशी दाखला .

सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडण्याची पद्धती खालीलप्रमाणे.

1) सदरचे खाते उघडताना कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत संपर्क करा.
2) पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या अर्जाची मागणी करा.
3) सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
4) 250/- रुपये भरून तुम्ही खाते सुरू करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना नियम व अटी

1) योजनेचे खाते मदतीपूर्व  बंद करता येणार नाही.
2 ) मुलीचे वय हे दहा वर्षाच्या आत आवश्यक आहे.
3) मुलीचे नागरिकत्व हे भारतीय असले पाहिजे.

मुलीच्या 18 वर्षानंतर किंवा 21 वर्षापर्यंत खाते बंद करता येते , मुलीच्या अठरा वर्षांनंतर जर का मुलीचे लग्न ठरले असेल, त्यावेळेस खाते बंद करून तुम्ही पैसे काढू शकता.  मुलीच्या 21 ( एकविसाव्या ) वर्षी सदरचे खाते हे मॅच्युअर होते, आणि तुम्हाला पैसे मिळतात.
खाते उघडताना कमीत कमी 250 रुपये देऊन खाते उघडले जाते , त्याच्या प्रमाणात तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त 1,50,000/- एक लाख 50 हजार पर्यंत रक्कम जमा करू शकता.

मुदतीपूर्वी खाते बंद करायचे असेल तर नियम व अटी

1) मुलीचे लग्न ठरले असल्यास.
2) मुली वरती वैद्यकीय जीवघेण्या आजारावरती उपचार असेल.
3) मुलीचा मॅच्युरिटी होण्याआधी मृत्यू झाल्यास.
4) बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याला जर का शंका असेल खाती चालू असेल आणि मुलीचा जीवित धोका आहे,किंवा त्रास होईल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खाते बंद केली जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर

सुकन्या समृद्धी योजना आर्थिक वर्ष 2024 ते 2025 यावर्षी सर्व साधारण 8.2% एवढा व्याजदर निश्चित केला गेला आहे.
या योजनेअंतर्गत दर तीन महिन्यानंतर सरकार व्याजदर ठरवत असते, आणि तो व्याजदर लागू होतो.
पोस्ट ऑफिस च्या नियमानुसार महिन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या खात्यातील शिल्लक रक्कम विचारात घेऊन, त्याच्यावरती व्याजाची आकारणी केली जाते.
प्रत्येक महिन्याला व्याजाचा दर वेगळा असला, तरी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटीच व्याज हे खात्यात जमा केले जाते. आणि व्याज हे दरवर्षी चक्रवाढ पद्धत तिने तुमच्या खात्यात जमा केली जाते.
या योजनेअंतर्गत तुम्हाला भरलेली रक्कम आणि मिळणारे रक्कम तपासायचे असेल, तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना च्या कॅल्क्युलेटर चा वापर करू शकता, आणि तो तुम्हाला गुगल वरती मिळेल.

सुकन्या समृद्धी योजने तुन मिळणाऱ्या रकमेचे उदाहरण पाहूया.

1) उदाहरणार्थ –

प्रत्येक महिन्याला जमा रक्कम 1,000/- हजार रुपये
वार्षिक जमा रक्कम. 1000 * 12 = 12,000/- हजार रुपये
व्याजदर 8.20%
वीस वर्षांमध्ये भरली जाणारी एकुण रक्कम
12,000 * 20 = 1,80,00/-

वीस वर्षांमध्ये व्याजाची रक्कम सर्वसाधारणपणे 8.20% टक्के नी. 3,94,570/- होते.

म्हणजे तुम्हाला एकूण मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी रक्कम
5 लाख 74 हजार 570/- रुपये  होते

2 ) उदाहरणार्थ –

प्रत्येक महिन्याला जमा रक्कम 5,000/- हजार रुपये
वार्षिक जमा रक्कम. 5000 * 12 = 60,000/- हजार रुपये
व्याजदर 8.20%
वीस वर्षांमध्ये भरली जाणारी एकुण रक्कम
60,000 * 20 = 9,00,000/-

वीस वर्षांमध्ये व्याजाची रक्कम सर्वसाधारणपणे 8.20% टक्के नी. 18,71,031/- होते.

म्हणजे तुम्हाला एकूण मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी रक्कम
27 लाख 71 हजार 03/- रुपये  होते.

कर सवलत.

सुकन्या समृद्धी योजना ही आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलती मिळतात.

सध्याच्या नवीन कर प्रणाली एखाद्याने निवडले असेल तर 80 C वजावट लागू होणार नाही त्यामुळे ठेवीच्या परिव्यक्तीवर मिळणारे व्याज हे करमुक्त राहणार आहे.

टिप

त्या योजनेचा असंख्य भारतातील नागरिकांना फायदा झाला आहे,या योजनेमुळे मुलींच्या आर्थिक स्वावलंबनाची खात्री करण्यासाठी भारतीय सरकारने उचललेले एक चांगली पाऊल आहे. या योजने मधल्या असलेल्या असंख्य फायद्यामुळे ही योजना देशातील लोकप्रिय बचत योजनेमध्ये सर्वश्रेष्ठ स्थानावरती जाऊन पोहोचले आहे. या योजनेमुळे मुलींचे भविष्याची चिंता पालकांची संपली आहे.

5 thoughts on “सुकन्या समृद्धी योजना : तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली!”

Leave a Comment