
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील बेरोजगारी बघता आणि मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास वावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो . मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.
Table of Contents
योजना तीन विभागात आहे.
1) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2) गट कर्ज व्याज परतावा योजना
3) गट प्रकल्प कर्ज योजना.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
1 ) या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी यापूर्वी या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ज्या जाती / गटासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा.
2) जाती / गटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.
3) दिनांक 01 जानेवारी 2019 पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादीची अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 तर महिलांकरता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.

5) या योजने अंतर्गत एकाच कुटुंबातील ( रक्त नाते संबंधातील ) व्यक्ती कर्जाकरिता सह कर्जदार राहिले असतील , तर अशा प्रकरणांना देखील महामंडळी मंजुरी देत आहे, परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून आवश्यक असेल.
6) या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या व प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
7) दिव्यांगासाठी योजना निहाय एकूण निधीच्या 40% निधी राखीव ठेवण्यात येईल , दिव्यांग हा व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
8) महामंडळाचे योजनेअंतर्गत चा लाभ हा कर्ज उचलल्यापासून पाच वर्षाकरिता किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल त्यासाठी लागू असेल.
9) कर्ज रक्कम रुपये दहा लाखाच्या मर्यादित व्याज पर्तवा कालावधी जास्तीत जास्त पाच वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. 12% असेल त्यानुसार जास्तीत जास्त 3 तीन लाखापर्यंतचा व्याज रकमेचा परतावा महामंडळामार्फत करण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गट कर्ज व्याज परतावा योजना.
* गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत खालील प्रकारचे गट पात्र असतील.
* शासनमान्य बचत गट ( इतर कोणत्याही शासकीय योजनेत मान्य असलेले)
* भागीदारी संस्था ( निबंधक, महाराष्ट्र राज्य, भागीदारी संस्था मुंबई यांनी प्राधिकृत केलेले )
* सहकारी संस्था ( जिल्हा उपनिबंधक यांनी प्राधिकृत केलेले )
* कंपनी ( कंपनी कायदा 2013 च्या नुसार ) .
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 10 लाख ते 50 लाख कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी पाच वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट , भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, अशा शासन प्रणालीत संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गट प्रकल्प कर्ज योजना.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या 10% दहा टक्के रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी.
* सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
* अक्षम मापदंडाच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
* एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
* दिव्यांगा करिता दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक.
* अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेली लाच जातीचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे.
* व्यावसायिक वाहनासाठी कर्ज घेतले असल्यास कर्जफेडीसाठीचा हा प्रति माहे असणे अनिवार्य आहे.
* जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
*उद्योग आजाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे
* अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
* बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
*अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी आवश्यक आहे.
* उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणाली द्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
*अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार / उमेदवार ची किमान शैक्षणिक अहर्ता इयत्ता दहावी उत्तीर्ण असावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उमेदवाराची नाव नोंदणी.
1) उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल
2) प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र असल्यास उमेदवारांस संगणीकृत अटी हेतु पत्र / मंजुरीपत्र दिले जाईल, उमेदवाराने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड .
पॅन कार्ड .
उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे ).
जातीचा दाखला
वयाचा दाखला.
पासपोर्ट साईज फोटो.
मोबाईल नंबर.
ई-मेल आयडी.
प्रकल्प अहवाल.

बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे.
आधार कार्ड .
रेशन कार्ड .
विज बिल .
उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना .
बँक खात्याचे स्टेटमेंट.
सिबिल रिपोर्ट.
व्यवसाय प्रकल्प अहवाल.
व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
बँक कर्ज मंजुरी पत्र,
बँक स्टेटमेंट
उद्योग सुरू करण्याबाबत परवाना.
व्यवसाय प्रकल्प अहवाल.
व्यवसायाचा फोटो.
संपर्क
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित,
जी टी हॉस्पिटल कंपाऊंड, बरुध्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सीएसटी स्टेशन जवळ,
मुंबई 400001
दूरध्वनी क्रमांक – 022-22657662 / 022-2265801
संपर्क – https://udyog.mahaswayam.gov.in
Good knowledge
ही योजना खरोखरच मराठा समाजातील युवकांसाठी एक चांगली संधी आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. या योजनेमुळे युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. व्याजाचा भार महामंडळ वाहून घेते, हे खूपच मोठे साहाय्य आहे. पण या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली आहे का? या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत का? मला वाटते, अशा योजना इतर समाजातील युवकांसाठीही सुरू करण्याची गरज आहे. तुमच्या मते, या योजनेचा युवकांवर कसा परिणाम होईल?
नवीन व्यवसायासाठी चांगली संधी