प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना.

देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी दिनांक 8 एप्रिल 2015 रोजी मुद्रा लोन योजना ही भारतातील संपूर्ण नागरिकांसाठी सुरू केली, ही योजना इतकी लोकप्रिय झाली की देशाचे अर्थमंत्री यांना दिनांक 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात याची मर्यादा 10 दहा लाखावरून 20 वीस लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली, त्याची अंमलबजावणी ही 24 ऑक्टोबर 2024 रोजी झाली.
ह्या योजनेचा उद्दिष्ट तळागाळातील नागरिकांचा युवकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणे हा आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही स्टार्ट अप इंडिया साठी बुष्ट देणारी योजना आहे. भारत सरकारचे मुख्य लक्ष आणि हेतू हा युवक वर्ग होता ज्या युवकांना नवीन व्यवसायामध्ये रुची आहे आणि त्यांना एक उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही सर्वात कारगर योजना ठरली. या योजनेमधून लाखो तरुणांना फायदा होऊन असंख्य युवकांची व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

योजनेचा उद्दिष्ट

भारत सरकारचा मुख्य हेतू हा स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सोपी करणे छोट्या उद्योग व्यवसायात द्वारे रोजगार निर्मिती वाढ करणे आणि छोट्या व्यवसायाकाना वाढीसाठी येणाऱ्या भांडवलाची समस्येवर मात करणे. कमी कागदपत्रात आणि सुलभ कर्ज मिळाल्यानंतर व्यवसायासाठी पोषक असे वातावरण निर्माण होऊन छोटी मोठी व्यवसायात वाढ होऊ शकते त्यामुळे रोजगारासाठी निर्माण होउ शकते.

कागदपत्रांची यादी

1) आधार कार्ड
2 ) पॅन कार्ड
3 ) रहिवासी दाखला
4 ) प्रोजेक्ट रिपोर्ट
5) बँक स्टेटमेंट
6 ) आयटीआर ( income tax ) असेल तर

योजना ही तीन विभागात आहे

  1. शिशु लोन
  2. किशोर लोन
  3. तरुण लोन
मुद्रा लोन

कर्जाची रक्कम खालील प्रमाणे

शिशु –  कर्ज मर्यादा 50 हजार पर्यंत.

किशोर – कर्ज मर्यादा 50 लाख ते 5 पाच लाख रुपये.

तरुण – कर्ज मर्यादा 5 पाच लाखाच्या पुढे 10 दहा लाखापर्यंत.

लोन साठी व्याजदर.

सर्वसाधारणपणे 8.40% ते 12.45% वार्षिक दराने व्याजाची आकारणी केली जाते. याचा कर्ज परतफेडीचा कालावधी 1 एक वर्षापासून 7 सात वर्षापर्यंत असतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया – स्टेट बँक पाच वर्षा पर्यंतची मुदत देऊन, सर्वसाधारणपणे दहा 10.15% पासून व्याज आकारणी करते .

बँक ऑफ बडोदा -बँक ऑफ बडोदा ही सर्वसाधारणपणे व्याजदर 9.65% पासून ते 5 पाच वर्षापर्यंत मुदत देते.

कार्पोरेशन बँक -कार्पोरेशन बँक 10 lack दहा लाखापर्यंत कर्जाची मर्यादा असून मुदत वाढ ही सात वर्षांपर्यंत ठेवलेली आहे आणि व्याजदर हा सर्वसाधारणपणे 9.30 % पासून सुरू होतो.

आंध्रा बँक -आंध्रा बँकेची पाच वर्षापर्यंत मुदत असून 10.40% वार्षिक व्याजाच्या आकारणी करते

बँक ऑफ महाराष्ट्र -सगळ्यात कमी 8.70% वार्षिक व्याजदर पासून सुरुवात करून पाच वर्षापर्यंत मुदत देते

मुद्रा लोन

मुद्रा लोन साठी सिबिलचे नियम

ही एक भारत सरकारने नवीन उद्योजकांसाठी आलेली योजना आहे वास्तविकता पाहता या मध्ये मुद्रा लोन मिळवण्यासाठी तुम्हाला सिबिल स्कोर ची आवश्यकता नाही.
परंतु वेगवेगळ्या बँकेचे त्यांचे वैयक्तिक वेगळे नियम असल्यामुळे तुम्हाला सिबिल हा चांगलाच असला पाहिजे कर्ज मिळवण्यासाठी.

उत्पन्नाचा पुरावा ( इन्कम डॉक्युमेंट )

मुद्रा लोन साठी जीएसटी आयटीआय किंवा बँक स्टेटमेंट ही आवश्यक नाहीत परंतु तुम्ही ते दिल्यास तुम्हाला कर्जाची रक्कम जास्त मिळू शकते आणि कर्ज मिळण्यास सोईस्कर होऊ शकते.

कर्ज मिळवण्यासाठी किती वेळ लागू शकतो

मुद्रा लोन साठी सर्वसाधारणपणे तुम्हाला आठ ते पंधरा दिवसाचा वेळ जाऊ शकतो यामध्ये बँकेचे कर्मचारी हे तुमचे संपूर्ण कागदपत्र तपासून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी व्हिजिट करू शकतात आणि त्यानंतरच तुम्हाला कोणत्या कॅटेगरी मधील कर्ज द्यायचे याविषयी ते निर्णय घेऊ शकतात.

कायदेविषयक

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमध्ये कर्जदार हा थकीत गेला किंवा डिफॉल्टर झाल्यास त्याच्यावरती कायदेशीर रित्या दिवाणी खटला दाखल करून त्याच्याकडून कर्जाची वसुली केली जाऊ शकते.

अर्ज कुठे करावा

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत ( PMMY ) तुमच्या जवळच्या कोणतेही बँकेमध्ये नॅशनलाईज बँक कॉर्पोरेट बँक आणि नॉन बेकिंग फायनान्स कंपनीमध्ये अर्ज करू शकता. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या इतर सर्व योजनांच्या माहितीसाठी मुद्रा लोन साठी तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.

मुद्रा लोन चे फायदे-

नवीन उद्योजकांना आणि स्टार्टअप करणाऱ्या लोकांसाठी ही एक योग्य साधन किंवा आर्थिक दृष्ट्या मदत आहे. ज्या लोकांना व्यवसाय सुरू करताना सगळ्यात मूलभूत असणारे आर्थिक पाठबळाची गरज असते त्या लोकांसाठी सरकार हमीदार म्हणून बँकेंना कर्ज देण्यास भाग पाडते आणि कर्ज बुडवल्यास सरकार जबाबदारी घेते म्हणून संपूर्ण लहान कंपन्यासाठी हे अतिशय अनुकूल असे आणि फायदेशीर आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना हे खेळते भांडवलासाठी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी विस्तार करण्यासाठी उपकरणे मशिनरी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्यक प्रदान करते , हे एम एस एम ई या व्यापक वर्गाला विनातारण कर्ज देणारी विशेषता सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना मदत करते , जे पूर्णपणे तारण मुक्त आहे यामध्ये कोणतेही वस्तू गहाण किंवा कॉलेक्टर देण्याची गरज नाही. मुद्रा लोन योजनेमुळे खऱ्या अर्थाने नवीन उद्योजकांच्या त्यांच्या मूलभूत गरजेंना आकार दिला गेला आहे,  त्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासामध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यांच्या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या असंख्य योजना आणि त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या कल्पनेतील प्रत्यक्षात उतरवण्यास ते सक्षम होत गेले . या योजनेमुळे मागच्या काही वर्षांमध्ये महिला आणि अल्पसंख्याक समुदायाला सक्षम बनवले गेले , त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढीसाठी नवीन संधी निर्माण झाल्या, त्यामुळे नवीन व्यवसाय निर्मितीचे वातावरण तयार झाले. सर्वात महत्वाची लहान व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यात या आणि अधिक समृद्ध भविष्याकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून चालना देण्याची महत्त्वाची भूमिका ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमुळे निर्माण झाली.

प्रधानमंत्री मुद्रा लोन आकर्षण

या योजनेचे प्रमुख आकर्षण म्हणजे  विनाकारण विना गॅरेंटर म्हणजे जामीनदार शिवाय पन्नास हजार पासून ते दहा लाखापर्यंत कर्ज मर्यादा उपलब्ध होत असल्यामुळे नवीन उद्योजकांना दिलासा मिळाला. 

अधिक माहितीसाठी.

https://www.mudra.org.in
https://www.myscheme.gov.in
https://www.udymimitra.in

वरील वेबसाईट वरती जाऊन अधिक माहिती घेऊ शकता

24 thoughts on “प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना.”

  1. खुप छान माहिती आहे सर अशी नवी नवीन माहिती द्यावी

    Reply
  2. छोट्या उद्योग व्यवसायांना कर्ज प्रक्रिया सोपी करण्याचा हा उपक्रम खूप उपयुक्त आहे. यामुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल सहज मिळू शकते. कर्जाच्या वेगवेगळ्या श्रेणी व परतफेडीच्या सोयी उद्योजकांना प्रोत्साहन देतात. मुद्रा लोन योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते आणि आर्थिक स्थैर्य वाढते. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत असल्यास त्यावर कसे कारवाई केली जाते?

    Reply
  3. भारत सरकारच्या या योजनेमुळे लहान व्यवसायांना खूप मदत होणार आहे. कर्ज प्रक्रिया सोपी केल्याने अनेक लोकांना स्वरोजगाराची संधी मिळेल. विविध कर्ज मर्यादा आणि व्याजदरांमुळे ही योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. नवीन उद्योजकांसाठी ही योजना खरोखरीच एक मोठी प्रेरणा आहे. कर्ज मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

    Reply
  4. The website design looks great—clean, user-friendly, and visually appealing! It definitely has the potential to attract more visitors. Maybe adding even more engaging content (like interactive posts, videos, or expert insights) could take it to the next level. Keep up the good work!

    Reply

Leave a Comment