PF पीएफ मधून पैसे काढण्याची प्रक्रिया आणखीन सुलभ!!

PF पीएफ

कॅन्सल चेक अपलोड करण्याची गरज नाही?

PF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच. ईपीएफओ ने पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया आता आणखीन सुलभ केली आहे, त्यानुसार क्लेम सादर करतेवेळी फॉर्म नंबर 31 भरताना, कॅन्सल चेक चा फोटो अपलोड करावा लागणार नाही. सोबतच संबंधित कंपनी किंवा नियुक्त्यांकडून आवश्यक मंजुरी घेण्याची ही गरज राहणार नाही.

PF पीएफ

कंपनी किंवा नियुक्त्यांची मंजुरी ही नको !

यापूर्वी क्लेम सादर करताना बँक खात्याच्या कॅन्सल चेक चा फोटो किंवा पासबुकची पडताळणी केलेली कॉपी अपलोड करावी लागत असे. याशिवाय जिथे नोकरी करतो तेथून बँक खात्याची पडताळणी करावी लागत होती.

PF मधून किती पैसे काढता येतात ?

सध्याच्या ईपीएफ काढण्याच्या नियमानुसार जर तुम्ही एका महिन्यासाठी बेरोजगार असाल तर तुम्ही तुमच्या ईपीएफ ऑफर्स पैकी 75 टक्के शेअर्स काढू शकता किंवा जर तुम्ही दोन महिने पेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल  किंवा त्याहून अधिक वेळ बेरोजगार असेल तर उर्वरित रक्कम काढता येते.

PF पीएफ

PF पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन पद्धत खालील प्रमाणे आहे

UAN साईडला जाऊन प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम वरती पहिल्यांदा क्लिक करा नंतर मला अर्ज करायचा आहे या टेबला तुम्ही निवडलं पाहिजे नंतर पूर्ण इपीएफ सेटलमेंटला क्लिक करा नंतर ईपीएफ भाग काढणे त्याच्यामध्ये कर्ज / ॲडव्हान्स आणि पेन्शन काढणे असे एकुण तीन ऑप्शन तुम्हाला उपलब्ध असतील . त्यानंतर तुमचा निधी काढण्यासाठी फॉर्म नंबर 31 ( PF ॲडव्हान्स ) निवडा आणि आवश्यक रक्कम आणि तुमचा पत्ता द्या.


PF withdrawal सादर करताना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी .

फॉर्म नंबर 19
फॉर्म नंबर 31
फॉर्म 10 C
फॉर्म नंबर 10 D
आधार कार्ड
पॅन कार्ड
वडिलांचे नाव
जन्मतारीख
बँक खाते पासबुक
दोन महसूल तिकिटे
वैद्यकीय प्रमाणपत्र
गृह कर्जाची कागदपत्रे
लग्नाची आमंत्रण
किंवा
शिक्षण शुल्क पावती

वरील फॉर्ममधून तुम्हाला ज्या गरजेसाठी विड्रॉल करायची आहे रक्कम तो फॉर्म सिलेक्ट करावा लागेल त्यासाठी लागणारी कागदपत्रे वेगवेगळे असू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या साठी गरज आहे तो फॉर्म निवडा आणि त्याप्रमाणे कागदपत्रे संकलित करून ते जमा करा.

PF काढण्यासाठी साधारणता वेळ किती लागतो.

PF विड्रॉल करण्यासाठी सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवस लागू शकतात सर्वप्रथम ऑनलाइन एप्लीकेशन केले पाहिजे.

यापूर्वी क्लेम सादर करताना खातेदाराचे नाव असणारा कॅन्सल चेक चा फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. ईपीएफओ च्या यु ए एन पोर्टल वरून क्लेम सादर करताना आता चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही, किंवा बँक खात्याची माहिती देखील द्यावी लागणार नाही. याशिवाय च्या कंपनीत नोकरी करता तिथून व्हेरिफिकेशन म्हणजेच मंजुरी घेण्याची गरज लागणार नाही.

PF पीएफ बॅलन्स तपासणीची पद्धत ?

UAN पोर्टलवर नोंदणीकृत सदस्य त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल देऊन ईपीएफओ कडे त्यांची माहिती उपलब्ध घेऊ शकता त्यासाठी मोबाईल नंबर 9966044425 या नंबर वर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. जर सदस्याचा बँक खाते क्रमांक आधार आणि पॅन क्रमांक यापैकी एक क्रमांकाची जोडलेला असेल तर सदस्याला शेवटच्या योगदानाची आणि पीएफची शिल्लक माहिती मिळेल.

PF पीएफ


ईपीएफओ कडून दोन्ही प्रक्रिया समाप्त करण्यात आल्या आहेत, बँक खाते सुरुवातीपासून युएएन खात्याशी लिंक असते, आणि त्याची पडताळणी ही केलेली असते. या वास्तव अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागणार नाही. या बदलामुळे क्लेम नाकरला जाण्याची शक्यता कमी होणार आहे.
तसेच खराब किंवा अस्पष्ट अपलोड केलेल्या फाईल मुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी घडणार आहेत.

केवायसी ची पडताळणी केलेल्या काही सदस्यांसाठी ही सुविधा यापूर्वी लागू होती. 28 मे 2024 रोजी सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा फायदा आतापर्यंत 1.7 कोटी सदस्यांना झाला आहे . आता ती सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे

ईपीएफओ चे 7. 74 कोटी सदस्य :-
ईपीएफओ चे 7.74 कोटी सक्रिय सदस्य आहेत यामध्ये 4.83 कोटी सदस्यांनी आपली बँक खाते यु ए एन क्रमांक अशी लिंक केलेली आहेत तसेच 14.95 लाख सदस्यांची बँक खाते सध्या नियुक्त्यांकडे प्रलंबित आहेत आता नियुक्ती त्यांच्या मंजुरीची गरज उरलेली नसल्यामुळे संबंधित सदस्यांना मोठा दिलासा मिळेल आणि क्लेमची प्रक्रिया वेगवान होईल.

PF पीएफ कस्टमर केअर संपर्क क्रमांक.

UAN / KYC सेवांशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही हेल्पडेक्स वर टोल फ्री क्रमांक 1800118005 या क्रमांकावर ती सकाळी 9:15 ते संध्याकाळी 5.45 पर्यंत 7 ही  दिवस आठवड्यातून संपर्क शकता.
आणि तक्रार मेल करण्यासाठी मेल आयडी – employeefeedback@epfiandia.gov.in
संपर्क करू शकता. 

2 thoughts on “PF पीएफ मधून पैसे काढण्याची प्रक्रिया आणखीन सुलभ!!”

  1. PF खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ झाल्याबद्दल खूप आनंद झाला. हे खरोखरच कर्मचाऱ्यांसाठी मोठी सोय ठरू शकते. मला वाटते की या बदलामुळे लोकांना त्यांचे पैसे लवकर मिळतील आणि प्रक्रिया अधिक सोपी होईल. मात्र, अजूनही काही गोष्टी स्पष्ट नाहीत, जसे की कागदपत्रांची आवश्यकता आणि प्रक्रियेचा वेळ. तुम्हाला वाटतं का की हे बदल पुरेसे आहेत किंवा अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे? मला असे वाटते की या प्रक्रियेत अजूनही काही गैरसोयी आहेत, विशेषत: जेव्हा कागदपत्रे जमा करण्याची गरज असते. तुमचं काय मत आहे?

    Reply
    • हो, ही खरंच आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ऑनलाइन पीएफ काढण्याची सुविधा झाल्यामुळे खूप साऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास हा कमी होणार आहे, अजून भरपूर त्रुटी शिल्लक आहेत, परंतु विशेषतः खूप दिवसांनी पीएफ बदल घडत आहेत, आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कागदपत्रांच्या जमा करण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल घडतील.

      Reply

Leave a Comment