2025 मध्ये मध शेती करणे तुमच्या जीवनाला गोड बनवण्याची संधी आहे. या संधीचा युवकांनी सोनं केलं पाहिजे आयुष्यामध्ये जोड व्यवसाय करत असताना शेतीला पूरक असा व्यवसाय निवडला पाहिजे .
फार पूर्वीच्या काळापासून मधाची शेती करतात. आपल्या आयुष्यामध्ये मधा चे खूप महत्त्वाचं स्थान आहे. आयुर्वेदात मधा साठी खूप महत्त्व आहे. मधा मध्ये असणारी जीवनसत्त्वे ही अनेक आजारांसाठी लढताना उपयुक्त ठरतात ही सत्त्व शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा उपलब्ध करून देतात , खूप सारी पुरातन पुस्तके सुद्धा याला दुजोरा देतात.
Table of Contents
विशेषता करून आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर मंडळी यांचा या मधावरती प्रचंड विश्वास आहे. आज जागतिक बाजारामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या ब्रॅण्डेड मध विकायला लागले आहेत, ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मधाचं मार्केट खूप मोठं आहे . मधाच्या मार्केटमध्ये आत्ता नवीन युवकांनी संधी शोधली पाहिजे संधीचं सोनं केलं पाहिजे नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसाय मध शेती सुरू करून शेतीचे उत्पन्न वाढवण्या बरोबर आर्थिक उत्पन्नही वाढवण्यावरती उपयुक्त असणारी मदत म्हणजे मध शेती उद्योग सुरू केला पाहिजे.

मध संधी सोनं – शेती बरोबर पूरक व्यवसाय मधाची शेती म्हणजे गोंड जिवणांची हमी …
मध शेती उद्योग – फार पूर्वी काळापासून मधाचा अन्न व औषध म्हणून उपयोग होत आहे, पोळे जाळून पिळून मध गोळा करण्याच्या परांपरागत पद्धतीमुळे मधमाशांचा व पोळ्यांचा नाश होतो, तसेच मध खराब प्रतीचा व लवकर खराब होणारा होतो.
सन 1946 मध्ये मध मंडळांने महाबळेश्वर येथे मधमाशा पालन केंद्र चालू केले, यामुळे आणि आधुनिक संशोधन केल्यामुळे मधमाशा व त्यांच्या पोळ्याचा नाश होत नाही, आणि पोळी पुन्हा वापरता येतात, त्यामुळे पोळी बांधण्यासाठी मधमाशांचा खर्च होणारा वेळ श्रम व अन्न याची बचत होती.
फक्त मधपेटीतून काढल्यामुळे उच्च प्रतीचा शुद्ध व अहिंसक मध मिळतो , राज्यातील सर्व भागातील व प्राधान्याने डोंगराळ व जंगल विभागातील मध शेती उत्पादकाना उत्पादनाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मध शेती उद्योग विकास कार्यक्रम हाती घेतला आहे .
मध मंडळामार्फत या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते, व सवलतीच्या दरात मधपेट्यांचा मधयंत्राचा पुरवठा करण्यात येतो, तसेच या मध शेती उद्योगा अंतर्गत उत्पादन, संशोधन, मध प्रक्रिया विक्री, राणीमाशी पैदास, इत्यादी कार्यक्रम मंडळामार्फत राबवण्यात येतात. मधपाळ यांनी उत्पादित केलेले मध खरेदी करून तो मधुबन या ब्रॅडने विक्री केला जातो.
मध शेती उद्योग वैशिष्ट्ये व फायदे.
वैशिष्ट्ये –
- पर्यावरण पूरक व्यवसाय,
- जागा
- इमारत
- वीज
- पाणी याकरिता गुंतवणूक नाही
- पूर्णपणे भारतीय देशी तंत्रज्ञान
- युवक ते थोरापर्यंत सर्वांना करता येणारा व्यवसाय.
- शेती व फळबागांना पूरक
- इतर कोणत्याही उद्योगाशी स्पर्धा नाही

फायदे-
- शुद्ध मधाचे उत्पादन
- शुद्ध मेणाचे उत्पादन
- परागीभवनामुळे शेतीचे व फळ बागायती पिकांच्या उत्पन्नात वाढ
- पराग, मधमाशांचे विष संकलन
- रॉयल जेली संकलन
- मधमाशांचे संरक्षण व संवर्धन
- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत
मध केंद्र योजना
महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 जून 2019 रोजी शासन निर्णाया द्वारे मदत केंद्र योजना मधमाशापालन संपूर्ण राज्यात राबविण्यात मान्यता दिलेली आहे.
प्रगतशील मधपाळ व प्रशिक्षण ( केंद्र चालक )
प्रगतशील मदपाळ प्रशिक्षण केंद्र चालक मधपाळ संस्थेचा सभासद किंवा कर्मचारी यांना मंडळातर्फे मध संचालनालय महाबळेश्वर येथे वीस दिवसाचे निवासी प्रशिक्षण दिले जाते.
मधपाळ प्रशिक्षण
वैयक्तिक शेतकरी / अर्जदार यांना मध संचालनालयामार्फत संचालनालय ठरविले त्या संस्था / व्यक्तिमार्फत दहा दिवसाचे निवासी प्रशिक्षण.
मधमाशा शेती उद्योग पालन छंद प्रशिक्षण- शेतकरी, शाळा , कॉलेज, विद्यार्थी, जेष्ठ, नागरिक, शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना मधमाशापालन एक छंद म्हणून पाच ५ दिवस मुदतीचे छंद प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच शासनाच्या कृषी आत्मा व वन विभागाची योजनेअंतर्गत मंडळामार्फत स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येईल.
मध शेती उद्योग पालन अर्थसहाय्य / अनुदान.
मध शेती उद्योग योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थींना मधमाशापालन उद्योगासाठी लागणाऱ्या मधपेट्या व इतर साहित्य च्या स्वरूपात 50% टक्के अनुदान देण्यात येत आहे व उर्वरित 50% टक्के स्व गुंतवणूक लाभार्थींनी करणे आवश्यक आहे.
मध खरेदी केंद्र चालक व मधपाळ या मधमाशा पालक उद्योजकांनी उत्पादित केलेला मध व मेन मध संचालना मार्फत हमीभावाने खरेदी केला जातो.

मध शेती उद्योग पात्रता –
मधपाळ –
अर्जदार साक्षर असावा, अर्जदाराचे वय 18 वर्षे किमान असावे, एक एकर शेतजमीन स्वमालकीची किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या मालकीची असावी.
प्रगतशील मधपाळ –
किमान दहावी पास, 21 वर्षे वय व मर्यादा , एक एकर शेतजमीन स्वमालकीची किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या मालकीची असावी.
मध शेती उद्योग –
या जोड व्यवसायामुळे रोजगार निर्मितीमध्ये भर झाले आहे शासनाने मधशेतीला केलेल्या पूरक योजनांमुळे युवकांच्या मध्ये एक चांगला रोजगार व स्वयंरोजगाराचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे,
मध शेती उद्योग या योजनेची सविस्तर माहिती शासनाच्या https://mskvib.org या संकेतस्थळावर मिळू शकते या संकेतस्थळावर गेल्यानंतर उद्योग विभाग असे नमूद असलेले आयकॉन दिसतो त्यावर जाऊन क्लिक करावे आणि तिथे शासनाचा निर्णय दिसेल दिनांक 18 जून 2019 ही तारीख नोंदवावी.
महाराष्ट्र हा भौगोलिक दृष्ट्या आणि त्यातील सातारा जिल्हा जंगल फळबागा वनक्षेत्र तेल बियाणे अशा उत्तमरीत्या वाढू शकणाऱ्या परिसरामध्ये मधशेती उद्योग हा एक पूरक व्यवसाय म्हणून पुढे येत आहे, मध शेतीमुळे हजारो शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक नवीन स्रोत निर्माण झालेला आहे,
त्यामुळे शासनाने मदत केंद्र योजना मधमाशापालन ही योजना राज्यातील सर्व भागात राबवण्याचा निर्णय घेतला आहे याची अधिकृत घोषणा 18 जून 2019 रोजी प्रस्तुत करण्यात आली आहे, राज्या ही योजना खादी आणि ग्राम उद्योग मंडळाच्या वतीने राबवण्यात येते, महाबळेश्वर येथे मध संचालन स्थापन करण्यात आले असून, याच्यामार्फत प्रशिक्षण साह्य आणि प्रचार करण्याचे काम हे महामंडळ करत आहे.
मध शेती ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर केली जाते.
मध शेती मध्ये सातारा जिल्हा एवढा पुढे गेला आहे की मधाचे गाव म्हणून मांघर हे गाव सातारा जिल्हा ओळख निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हातील ही पाटगाव हे गाव सुद्धा राज्यात पुढे येत आहे .
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी मधाचे गाव ही योजना राबवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.
शेतकऱ्यांना जोड उत्पन्न, सेंद्रिय शेती, निसर्गचक्रालाही लाभ, मध प्रक्रिया उद्योग, गावाचे सुशोभीकरण आणि पर्यटन वाढीस चालना देणारा हा एक उद्योग आहे. मधाच्या शेतीचे खूप सारे असे अनेक फायदे या निमित्ताने पुढे येत आहेत.
nice information
मध शेती हा खरोखरच एक चांगला व्यवसाय आहे आणि तो नवीन पिढीसाठी एक उत्तम संधी आहे. तुमच्या या लेखातून मध शेतीचे महत्त्व आणि त्याचे फायदे स्पष्टपणे समजले. मध शेतीमुळे केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या देखील लोकांना फायदा होतो असे दिसते. संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे हा उद्योग आणखी विकसित होऊ शकतो यात काही शंका नाही. माझ्या मते, युवकांनी ह्या संधीचा चांगल्या प्रकारे वापर करून स्वतःसाठी एक चांगला जीवन निर्माण करावे. तुम्हाला नवीन युवकांना या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील?