TW -3 Test

TW -3 Test चाचणी आता सर्वसाधारणपणे संपूर्ण भारतामध्ये एकच विषय आहे तो म्हणजे TW – 3 Test टेस्ट चाचणी म्हणजे नक्की काय? वास्तविकता ही चाचणी खेळाडूंच्या संदर्भात असून खेळाडूंचे वय तपासणीसाठी या चाचणीचा वापर केला जातो.

TW -3 Test

TW – 3 Test चाचणी अनिवार्य आहे का?

हो , TW – 3 Test खेळाडूच्या वयाबद्दल होणारे वाद टाळण्यासाठी आणि नवीन खेळाडूच्या वयाच्या शंका निरासन करण्यासाठी TW – 3 Test या टेस्टची चाचणी केली जाते आणि यामधून खेळाडूचे एक्चुअल वय हे वैद्यकीय द्वारा सिद्ध केले जाते. यामधून खेळाडूच्या वयाबद्दल होणारे वाद टाळले जातात आणि त्यामधून कोणत्याही खेळाडू वरती अन्याय होत नाही. म्हणून TW – 3 Test ही चाचणी करणे अनिवार्य आहे.

TW – 3 test आत्ताच चर्चा होण्यामागची कारणे कोणती आहे त.

TW – 3 Test याचं खरं कारण आता भारतामध्ये सुरू असलेली आयपीएल मॅच, यावरून या विषयाला खरी सुरुवात झाली आहे. आयपीएल 2025 चा सर्वात तरुण खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशी हा संपूर्ण जगासमोर आला आहे. आता  वैभव सूर्यवंशी च्या वया बद्दल खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत, वैभव सूर्यवंशी हा 14 वर्षाचा आहे का सोळा वर्षाचा ?  यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे TW – 3 Test या टेस्ट बद्दल चर्चेला उदान आले आहे.

TW -3 Test


वास्तविकता आयपीएलच्या रेकॉर्ड बुक नुसार वैभव सूर्यवंशी चा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून ,  त्याचे सध्याचे वय 14 वर्ष 36 दिवस आहे . प्रसिद्ध सांखिक तज्ञ मोहनदास मेनन यांनी वैभवच्या वयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते, मोहनदास यांनी त्यांच्या जुन्या मुलाखतीचा उल्लेख केला आहे , आणि त्यामध्ये वैभवने  सप्टेंबर 2023 मध्ये 14 वर्षाचा होईल असे बोलला होता, या मुलाखतीचा आधार घेऊन त्याच्या वयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याचा अर्थ जर वैभवच्या विधानाला आधार म्हणून घेतले, तर त्याचे 23 सप्टेंबर रोजी त्याचे वय सोळा वर्षे होईल असे निदर्शनात येत आहे.

परंतु वैभव चे वडील संजीव सूर्यवंशी यांनी वैभव वर झालेल्या सर्व फसवणुकीचे आरोप फेटाळले आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच बीसीसीआय बों चाचणी ( TW – 3 Test ) दिली आहे असे सांगितले आहे. कारण तो आधीच भारताकडून अंडर नाईन्टीन ( 19 ) खेळला आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीच भीती नाही, असे सांगितले असून त्यांनी TW – 3 Test पुन्हा चाचणी देण्यास सुद्धा तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारतामध्ये सध्या स्थितीला फक्त बीसीसीआय त्यांच्या खेळाडूंसाठी TW – 3 चाचणी आयोजित करते, आणि ही चाचणी खेळाडूच्या वयाची पडताळणी तसेच वयोगटानुसार योग्य पात्रता निश्चित करण्यासाठी BCCI कडुन  वापरली जाते.


TW – 3 Test चाचणी म्हणजे काय ?

TW – 3 Test – चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये खेळाडूच्या डाव्या हाताच्या मनगटाचे एक्स-रे घेतले जातात हाडाच्या वाढीच्या टप्प्यावरून जैविक वय म्हणजेच ( bon – age ) ठरवले जाते.
या प्रक्रियेत 20 हाडांचे निरीक्षण केले जाते जे सुरुवातीला कार्टी लेझरने विभक्त असतात आणि वय वाढल्यास ते एकत्र येतात ही चाचणी मुख्यता सोळा वर्षाखालील खेळाडूंमध्ये प्रभावी आहे सोळा वर्षानंतर हाडांची वाढ पूर्ण झाल्यामुळे TW – 3 Test चाचणी ची उपयुक्तता कमी होत जाते.

TW – 3 Test चा स्कोर म्हणजे नक्की किती ?

TW – 3 Test ची बीसीसीआयच्या धोरणानुसार TW – 3 चाचणीमध्ये मुलांसाठी 16.4 किंवा त्यापेक्षा कमी आणि मुलींसाठी 14.9 किंवा त्यापेक्षा कमी स्कोर आवश्यक आहे, TW – 3 Test ही चाचणी खेळाडूच्या पूर्ण कारकीर्द एकदाच घेतली जाते , आणि ती सर्व वयोगटाच्या स्पर्धांसाठी वैद्य असते. कारण TW – 3 Test ही चाचणी वयाच्या सोळा वर्षाच्या आत मध्येच करायची असते, आणि सोळा वर्षानंतर TW – 3 Test ह्या चाचणीचा अहवाल तेवढा महत्त्वाचा राहत नाही.

सध्या स्थितीमध्ये फक्त राज्य संघटना खेळाडूंची TW – 3 Test चाचणी घेण्यात येते, जी BCCI च्या निरीक्षकांच्या उपस्थित केली जाते,  TW – 3 Test ही चाचणी केल्यानंतर, नमुना तज्ञांकडे पाठवला जातो, आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट मिळतो.

TW -3 Test

2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या रसिक सलाम दार ने  वयाची फसवणूक केली होती, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावरती दोन वर्षाची बंदी घातली होती.

म्हणून सध्या स्थितीमध्ये TW – 3 Test चाचणी प्रत्येक खेळामध्ये करणे खूप आवश्यक आहे. आणि यासाठी पूर्णपणे खेळाडूंच्या मधून मागणी होत आहे, क्रिकेट बरोबर भारतासारख्या देशांमध्ये इतर भरपूर खेळले जातात , आणि त्यामध्ये सुद्धा अशा खूप खेळाडूंच्या बद्दल काही घटना घडल्या आहेत की जिथे वयाच्या वरून वाद निर्माण झाले म्हणून TW – 3 Test अनिवार्य आहे.

भारत सरकारने ऑलिंपिक साठी जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी नवीन नवीन योजना निर्माण झाले आहेत, त्यामध्ये नियमावली अजून कडक केली पाहिजे आणि नवीन खेळाडू वरती होणारा अन्याय हा थांबवला पाहिजे अशी खेळाडूंच्या मधून भावना व्यक्त होत आहेत.


भारतातील कोणत्या संघटना करतात ?

भारतामध्ये आत्ताच्या सद्यस्थितीला अखिल भारतीय फुटबॉल महासंघ  AIFF आणि भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ. BCCI या क्रीडा संघटना फक्त TW – 3 Test चाचणी वापर करतात.

भारतामध्ये आता फक्त सध्या स्थितीला अखिल भारतीय फुटबॉल ( AIFF ) महासंघ आणि भारतीय क्रिकेट नियमा मंडळ ( BCCI ) आणि राष्ट्रीय टेनिस महासंघ ( AITA ) संघटनेनेच आता सुरुवातीला खेळांमधील वयाच्या फसवणुकीच्या धोकाधडी पासून सावधान राहण्यासाठी TW – 3 Test चाचणीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने घोषणा केली आहे, परंतु वैद्यकीय तज्ञ लोकप्रिय पद्धतीच्या मर्यादा स्पष्ट न केल्यामुळे आणि FFLS पद्धत आणि एपीजे नीटिक क्लॉक सारख्या अधिक विश्वासहर्थ तत्रा चा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

TW – 3 Test मोठ्या प्रमाणात वापरली जात असून अधिक अचूक पद्धतीपैकी मानली जात आहे, बीसीसीआय BCCI अखिल भारतीय फुटबॉल महासंघ AIFF आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण SAI या सह देशातील आघाडीच्या क्रीडा संघटना खेळाडूंना TW – 3 Test ची चाचणीमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत.

TW -3 Test

धावपळीच्या युगामध्ये स्पर्धात्मक संघर्ष खूप प्रमाणात वाढल्या असल्यामुळे, पालक वर्ग आणि युवक हा पूर्णपणे करिअरच्या वेगवेगळ्या वाटा शोधत आहे.
भारत असा देश आहे , ज्याच्यामध्ये 100 कोटी लोकसंख्या असून सुद्धा खेळामध्ये सध्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिती मजबूत करण्याचा आणि भक्कम पाया रचण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी खेळाडूंना लागणाऱ्या सर्व सोयी पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आणि वेगवेगळी राज्य सरकार आपापल्या परीने त्यांच्या राज्यामध्ये प्रयत्न करताना दिसत आहेत.

भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नवनवीन योजनेचा फायदा हा खेळाडूंना मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, त्यासाठी स्वतंत्र शासकीय नोकरीमध्ये कोटा निर्माण केला आहे.
त्यामध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री अशा वेगवेगळ्या पदावरती ही नियुक्ती केली जाते. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये खेळाडूंमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Leave a Comment