Forget the traditional method of paying LIC premium : whats app is the new way!


Forget the traditional method of paying LIC premium : whatsapp is the new way ! LIC premium एलआयसी प्रीमियम भरताना विसरा पारंपारिक पद्धती: व्हाट्सअप आहे नवीन मार्ग ! भारतामध्ये आत्ता सगळ्यात मोठी असलेली विमा कंपनी म्हणजे एलआयसी. देशामध्ये आता च्या घडीला कोट्यावधी पॉलिसी धारक हे एकट्या एलआयसीचे आहेत.

भारतीय जीवन विमा निगम LIC बद्दल:-

भारतीय जीवन विमा निगम LIC ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचे आहे.1 जुन 1956 ला एल आय सी ची स्थापना करण्यात आली. एल आय सी चे मुख्यालय हे मुंबईमध्ये असून, त्याची 8 क्षेत्रीय कार्यालये आहेत, आणि 113 विभागीय कार्यालय असून, 2048 शाखा, आणि 54 ग्राहक सेवा केंद्र व 25 महानगर सेवा केंद्र आहेत. एलआयसी मध्ये आत्ता कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 15 हजार 996 इतके आहे.

Forget the traditional method of paying LIC premium

भारतीय जीवन विमा महामंडळ एलआयसी आपल्या पॉलिसीधारकांसाठी वेगवेगळ्या योजना आणि सोई उपलब्ध करून देत असते, यासाठी एलआयसी 24 तास प्रयत्न करत असते. विमाधारकांना सेवा देण्याचा प्रयत्न हा एलआयसीच्या माध्यमातून होत असतो.


सद्यस्थितीमध्ये देशामध्ये टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटचा वापर हा जास्त प्रमाणात झाल्यामुळे आणि गावोगावी एलआयसीचे विमाधारक असल्यामुळे त्यांना एलआयसीचा प्रीमियम भरण्यासाठी एलआयसी एजंट कडे किंवा एलआयसी ऑफिस कडे जाऊन भरणा करावा लागत होता.


त्यामुळे एलआयसीचा प्रेमी वेळेत न भरणे किंवा फसवणूक होणे प्रीमियम भरल्यानंतर रिसिप्ट न मिळणे अशा खूप काही गोष्टी घडत होत्या, अशा सर्व गोष्टी वारंवार घडत असून त्याच्यात बदल करणे खूप काळाची गरज होती म्हणून एलआयसी ने व्हाट्सअप बोट सेवेद्वारे एल आय सी चा हप्ता भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

भारतीय जीवन विमा महामंडळ एलआयसी च्या या पर्यायामुळे विमाधारकांना ऑनलाइन प्रीमियम भरण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या देशांमध्ये एलआयसी च्या ग्राहक पोर्टलवर 2.2 कोटी होऊन अधिक नोंदणीकृत पॉलिसीधारक आहेत यापैकी दररोज सर्वसाधारणपणे 2 ते 3 लाखा पेक्षा अधिक ग्राहक विविध ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी लॉगिन करत असतात, त्यामुळे ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध ठरणार आहे.

सुरुवातीपासूनच एलआयसी ही त्यांच्या व्यवसायाच्या ऑपरेशन साठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणारी ही भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. 1950 च्या नंतर आलेल्या युनिट रेकॉर्ड मशीन्स 1964 पासूनच मायक्रोप्रोसेसर आधारित संगणकासह टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. नंतर संपूर्ण एलआयसी ने ऑपरेशन कामा साठी 1980 मध्ये संपूर्ण विभागीय कार्यालय आणि शाखा कॉम्प्युटरच्या माध्यमातून सुसज्ज सुशिक्षित करण्यात आल्या.
एलआयसी ही संस्था नवीन योग्य संगणक तंत्रज्ञानासह अपडेट राहण्यात सतत अग्रगण्य आहे.

व्हाट्सअप च्या माध्यमातून LIC premium एलआयसी ची सेवा कशी मिळणार.

Forget the traditional method of paying LIC premium

traditional method of paying LIC premium सर्वप्रथम सर्व विमाधारकांनी एलआयसी पोर्टलवर त्यांची नोंदणी केली पाहिजे. नंतरच्या ज्या पॉलिसी धारकांनी एलआयसीच्या ग्राहक पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांनी +91-8976862090 या मोबाईल नंबर वरती HI असा मेसेज व्हाट्सअप वरती टाकावा . त्यानंतर तुम्हाला एलआयसीच्या जेवढ्या सुविधा उपलब्ध असतील त्याचे सर्व पर्याय तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसले जातील. जे तुम्हाला या सेवांचा लाभ घेण्यास मदत करतील याला सी पॉलिसी सेवा निवडण्यासाठी तुम्ही यातील पर्याय क्रमांक निवडू शकता.

LIC ग्राहक पोर्टलवर नोंदणी कशी करावी.

  • 1 ) सर्वप्रथम तुम्हाला ग्राहक पोर्टल www.licindia.in वरती जावे लागेल.
  • 2) कस्टमर पोर्टलवर क्लिक करा.
  • 3 ) तुम्ही पोर्टलवर नवीन असाल तर न्यू युजरला क्लिक करा.
  • 4 ) त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
  • 5) नवीन युजर आयडी ने लॉगिन करा.
  • 6 ) बेसिक सर्विसेस अँड पॉलिसी पर्यायावर क्लिक करा.
  • 7 )तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सर्व पॉलिसींची नोंदणी करून घ्या.
  • 8 ) तुमचा सर्व पॉलिसी क्रमांक तुमच्याकडे पाहिजे
  • 9 ) पॉलिसीचा हप्ता माहिती ठेवा
  • 10 ) 100kb पेक्षा कमी आकाराची पॅन कार्ड आणि पासपोर्ट स्कॅन केलेला फोटो जेपीजी स्वरूपात असावा.

Forget the traditional method of paying LIC premium : whatsapp is the new way च्या एलआयसी प्रीमियर सर्विसेस साठी नोंदणी कशी करावी.

Forget the traditional method of paying LIC premium

एलआयसी प्रीमियम सर्विस घेण्यासाठी तीन टप्प्यात प्रक्रिया पूर्ण करावी लागते

  • सर्वप्रथम तुम्ही LIC ग्राहक पोर्टल वरती नोंदणीकृत यूजर असायला हवे आहे , जर का तुम्ही नोंदणीकृत युझर्स असाल, तर तुमच्या युजर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा.
  • कागदपत्राची नोंदणी
  • प्रिंटिंग
  • अपलोडिंग

Step 1 ) नोंदणी फॉर्म भरणे

विमाधारकाने एलआयसी ग्राहक पोर्टल वापरकर्त्यासाठी नोंदणी करताना पॉलिसी घेताना दिलेली जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी मूलभूत माहिती नोंदणी फॉर्म मध्ये भरली पाहिजे त्यानंतर ते आपोआप सिस्टीमला जोडली जाईल.

Step 2 ) फॉर्म प्रिंटिंग करणे.

  • सर्वप्रथम तुम्ही भरलेला फॉर्म हा तपासा आणि त्याची प्रिंट काढा
  • प्रिंट केलेल्या फॉर्म वरची माहिती तपासल्यानंतर त्याच्यावरती तुमची सही करा.
  • त्यानंतर तुम्ही प्रिंट केलेला फॉर्म आणि तुमचे ओळखपत्र असणारे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड चा फोटो स्कॅन  करा.
  • तुम्ही स्कॅन केलेले फाईल 100kb च्या आतील असावी.
  • त्यानंतर स्कॅन केलेली फाईल ही JPG. फॉरमॅटमध्ये सेव करा.


Step 3 ) फॉर्म अपलोड करणे.

  • त्यानंतर ग्राहक पोर्टल वरती दिलेल्या पर्यायाचा वापर करून स्कॅन केलेली फाईल फोटो ही अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट करा आणि रिक्वेस्ट वरती क्लिक करा.
  • त्यानंतर ग्राहक पोर्टल एलआयसीच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल वरती आणि ईमेल आयडी वरती त्यासंदर्भात एसएमएसच्या माध्यमातून कळविण्यात येईल.
  • त्यानंतर ही सर्व माहिती ग्राहक पडताळणीसाठी पाठवली जाते.
  • एलआयसीच्या माध्यमातून कस्टमर झोन अधिकाऱ्यांनी नोंदणी केलेल्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत तुमची पडताळणी केली पाहिजे आणि त्यानंतर पडताळणी संबंधी तुम्हाला एक ईमेलवर आणि मोबाईल वरती एसएमएस माध्यमातून कन्फर्मेशन पाठवले जाते

Leave a Comment