चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ म्हणजे Sant Rohidas Leather and Tannery Development Corporation (Lidcom) संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ . संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 1 में 1974 रोजी कंपनी अधिनियम 1956 अनुसार करण्यात आली. अनुसूचीत जातीतील चर्मकार समाजातील ( चांभार, ढोर, होलार व मोची इत्यादी ) आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाह त्यांना मानाचे स्थान मिळवण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.

Table of Contents
Sant Rohidas Leather and Tannery Development Corporation (Lidcom) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना १ मे १९७४ रोजी झाली. सुरुवातील ५ कोटी रु. असलेले शासकीय भाग भांडवल जी.आर.क्रं. १०९७/१३१५४/SCP२ नुसार दि. १० मार्च १९९८ पर्यंत ५० कोटींपर्यंत वाढले. ३१ मार्च २००७ पर्यंत LIDCOM चे शासकीय भाग भांडवल ७३.२१ कोटी रु. एवढे आहे.राज्य शासनाचा भाग भांडवलात १००% हिस्सा आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. LID/ १०९५/६४६१/IND-५ नुसार, लिडकॉम ला उद्योग विभागकडून समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. चर्मोद्योगाच्या विकासात कार्यरत असणाऱ्या समुदायास आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Sant Rohidas Leather and Tannery Development Corporation (Lidcom) संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ.संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून आर्थिक लाख मिळवण्यास सर्वसाधारणपणे आवश्यक असणाऱ्या बाबी :-
1) अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
२) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३) अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे.
४) अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
५) अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ३,००,०००/- असावे.
६) जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकार्याने दिलेला असावा.
७) अर्जदारांनी या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
८) महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोबत जोडावयाची कागदपत्रे.
१) पासपोर्ट साईज तीन फोटो
२) रेशन कार्ड च्या झेरॉक्स प्रती
३) अर्जदाराचा शैक्षणिक दाखला.
४) आधार कार्डची छायांकित प्रत.
५) ज्या ठिकाणी व्यावसायिक करावयाचा असेल त्या जागेची कागदपत्रे.
६) व्यवसाय करावयाचे असलेली जागा जर का भाडे तत्त्वावर असेल तर भाडे पावती करार पत्र.
७) दोन सक्षम जामीनदार नोकरदार किंवा मालमत्ता धारक/ शेतकरी
८) व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र.
९) व्यवसायासाठी खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्य पत्राचे दर पत्रक.
१०) अर्जदाराचा जातीचा दाखला
११) अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे.
१) अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरूपात उपलब्ध असेल
२) अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत करावयाची कारवाई खालील प्रमाणे-
जिल्हा कार्यालयात विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना व बीज भांडवल योजनेखालील अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कागदपत्राची छाननी करून व कर्ज प्रकरणात प्रत्यक्ष पाहणी करून अहवालासह प्रथम जिल्हाधिकाऱ्यामार्फत लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर करण्यात येते व नंतर स्थानिक सेवा क्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेस मंजुरीसाठी शिफारस करतात..
जिल्हा कार्यालयात एम एस एफ डी सी योजने कर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक परिसर त्या प्रकरणाची नोंद करून, कागदपत्राची छाननी करून व प्रत्यक्ष स्थळ पाणी करून जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर करण्यात येतो, नंतर स्पष्ट अभिप्रायासह प्रादेशिक कार्यालयाकडे तो अर्ज पुढील कारवाईसाठी शिफारस करतात
प्रादेशिक कार्यालयामार्फत जिल्हा कर्ज प्रकरणाची नोंद करून सोबत पाठवण्यात आलेल्या कागदपत्राची शहानिशा करण्यात येते व कर्ज प्रकरणाची मुख्य कार्यालयाकडे शिफारस करण्यात येते.

मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या जिल्हा निहाय उद्दिष्ट प्रमाणे प्रादेशिक अधिकारी योग्य त्या शिफारशी सह जिल्हा वार कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी मुख्यालयात शिफारस करतात.
मुख्यालयात संबंधित शाखेत प्रादेशिक अर्ज प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत करावयाची कारवाही व्यवसाय निहाय झालेल्या कर्ज प्रकरणाची नोंद घेतली जाते व कर्ज प्रकरणाची छाननी करून निधी उपलब्धतेनुसार मंजुरी प्रदान केली जाते.
संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजना –
- 50% टक्के अनुदान योजना
- बीज भांडवल योजना
- प्रशिक्षण योजना
- गटई स्टॉल योजना
संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या योजना –
- उत्कर्ष कर्ज योजना
- सुविधा कर्ज योजना
- महिला अधिकारिता योजना
- लघु ऋण योजना
- लघु ऋण योजना
- शैक्षणिक कर्ज.
50% टक्के अनुदान योजना-
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 50 हजार पर्यंत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या व्याजदराने अर्थसहाय्य दिले जाते या अर्थसहा पैकी रुपये 10,00/- हजार कमाल मर्यादेपर्यंत 50% कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते, उर्वरित कर्जाची परतफेड 36 ते 60 समान मासिक हप्त्यात अथवा बँकेने ठरवून दिलेल्या आपल्या बँकेकडे परतफेड करावी लागते.
बीज भांडवल योजना-
रु 50,001/- ते. 5,00,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध करण्यात येतो.या योजने अंतर्गत 5,00,000/- लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा प्रचलित व्याजदराने बँकेमार्फत करण्यात येतो,
या योजनेअंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमेपैकी 75% कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते.
5% टक्के ही लाभार्थ्यांनी स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करायची असते.
25% टक्के ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते.
त्या रकमेपैकी 10, 000/- अनुदान म्हणून देण्यात येतात तर पूर्वैद रक्कम ही 4% या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक हप्त्यात एकाच वेळी करावयाची असते.
प्रशिक्षण योजना –
सदर योजनेअंतर्गत महामंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना युवकांना प्रशिक्षण देण्यात येते.
गटई स्टॉल योजना.
रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना गटई स्टॉल पुरवण्याची योजना 100% अनुदान तत्त्वावर आयुक्त समाज कल्याण पुणे व संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास
महामंडळामार्फत संयुक्तपणे राबवण्यात येते.
उत्कर्ष कर्ज योजना
या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना १० लाख ते ५० लाख रु. पर्यंतच्या प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या अंतर्गत प्रकल्प रकमेच्या ९०% रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात प्रदान केली जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत हे कर्ज ९% व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते आणि याचा परतफेड कालावधी हा ७ वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत कर्जाचा स्थगिती कालावधी हा वृक्षारोपण व बांधकाम व्यवसायासाठी १२ महिने , तर इतर व्यवसायांसाठी ६ महिने एवढा करण्यात आलेला आहे.

सुविधा कर्ज योजना
या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना १० लाख रु. पर्यंतच्या प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या अंतर्गत प्रकल्प रकमेच्या ९०% रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात प्रदान केली जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत हे कर्ज ८% व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते आणि याचा परतफेड कालावधी हा ५ वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत कर्जाचा स्थगिती कालावधी हा वृक्षारोपण व बांधकाम व्यवसायासाठी १२ महिने , तर इतर व्यवसायांसाठी ६ महिने एवढा करण्यात आलेला आहे.
महिला अधिकारिता योजना-
या योजनेंतर्गत लिडकॉम मार्फत चर्मकार समाजातील महिलांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाचे वितरण केले जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत विविध योजनांसाठी ५,००,००० रु. पर्यंतचे मुदत कर्ज प्रदान केले जाते. एकूण प्रकल्पाच्या ७५% कर्ज हे एन.एस.एफ.डी.सी मार्फत साधारणपणे ६% व्याज दरात , तर महामंडळामार्फत १०००० रु. अनुदानासह प्रकल्पाच्या २०% कर्ज हे ४% व्याज दरात दिले जाते. यामध्ये लाभार्थ्यांचा सहभाग हा प्रकल्प रकमेच्या ५% एवढा असतो
लघु ऋण योजना
या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना ५% प्रति वर्ष व्याज दराने १,४०,०००० रु. पर्यंतची प्रकल्प रक्कम कर्ज स्वरुपात दिली जाते. या रकमेतील ३१००० रु. अनुदान म्हणून , ४००० रु. लाभार्थी सहभाग आणि उर्वरित रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात एन.एस.एफ.डी.सी मार्फत दिली जाते. या योजनेसंबंधीचा अर्ज हा लिडकॉम च्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध होतो.
महिला समृद्धी योजना –
या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील सर्व महिला तसेच विधवा, विभक्त महिला (प्राथमिकता देण्यात येते) यांना १,४०,००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते , ज्यापैकी ३१००० रु. हे अनुदानाच्या स्वरुपात, ४००० रु. लाभार्थी सहभाग आणि उर्वरित १,३५,००० रु. रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात एन.एस.एफ.डी.सी मार्फत दिली जाते. यामधील कर्जाचा व्याजदर ४% असून यासंबंधीचे अर्ज हे लिडकॉम च्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध होतो
शैक्षणिक कर्ज –
नवी दिल्ली स्थित एन.एस.एफ.डी.सी मार्फत २००९ सालापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत भारतातील पदवीत्तर शिक्षणासाठी ३० लाख रु. पर्यंतचे, तर परदेशी पदवीत्तर शिक्षणासाठी ४० लाख रु. पर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. या अंतर्गत भारतातील पदवीत्तर शिक्षणासाठी महिलांना ५.५% तर पुरुषांना ६% व्याज दराने; तर परदेशी पदवीत्तर शिक्षणासाठी महिलांना ६.५% तर पुरुषांना ७% व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. या शैक्षणिक कर्जाचा परतफेड कालावधी हा १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी १० वर्षे तर त्यापुढील कर्जासाठी १२ वर्षे एवढा आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
Sant Rohidas Leather and Tannery Development Corporation ( Lidcom )
45 , वीर नरिमन मार्ग,
बॉम्बे लाइफ बिल्डिंग,
पाचवा मजला, फोर्ट ,
मुंबई – 400001
दूरध्वनी क्रमांक – 022-22044186
E-mail – md@lidcom.in