Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

Update 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ ही कोणत्याही प्रकारची रेशन कार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात.

Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana

तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच ज्यांचे आर्थिक समर्थन अत्यंत कमकुवत आहे , अशा गरीब लोकांसाठी शस्त्रक्रिया , प्रत्यारोपण, थेरेपी  यासारख्या महागड्या आरोग्य सेवा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पुरवल्या जाणार आहेत. या सर्व आजारासाठी महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय निवडली गेलेली आहेत.

Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana update 2025 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पात्रता …

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2025 नोंदणीची पात्रता
  • 1 अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे आहे.
  • 2 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेतील अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana
  • 3 महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या म्हणजे पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड ज्याच्याकडे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • 4 या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेले शेतकरी लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अत्यंत गरीब असणाऱ्यांना आणि आर्थिक कमकुवत असणाऱ्या जनतेसाठी होणाऱ्या हॉस्पिटलच्या खर्चापासून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू केली त्यामुळे जनतेमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या या योजनेचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणात होऊन ही योजना लोकांनी डोक्यावरती घेतली.

Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana योजनेची कार्यपद्धती..

महाराष्ट्रातील राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही योजना शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील रहिवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

तसेच ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन किंवा शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन त्यांच्या आजारा हा तपासून घ्यावा लागेल.

त्यानंतर अर्जदारास त्याच्या आजाराची तपासणी ही तज्ञ डॉक्टर कडून करून घ्यावी लागेल एकदा का आजाराची खात्री झाल्यास रोगाचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्रांना कळवून नोंदविला जाईल तसेच आजाराचा त्रास रुग्णालय व डॉक्टरांचा खर्च या योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन दाखल केला जाईल.

ही प्रक्रिया 24 तासाच्या आत पूर्ण होईल त्यानंतर  रुग्णावर  उपचार सुरू केले जातात, आणि उपचारादरम्यान कोणताही उपचार हा संबंधित खर्च रुग्णांकडून घेतला जात नाही.

Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana योजना 2025 लाभार्थ्यांची जिल्हा निहाय यादी..

पिवळ्या अत्योदय अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका धारक ज्यांचे उत्पन्न हे एक लाखापर्यंत आहे, तसेच छत्रपती संभाजी महाराज नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असणार आहे.

Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana

Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana योजने अंतर्गत विमा संरक्षण..

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2025 या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष दीड लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रति वर्ष अडीच लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणतेही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीला वरील योजनेचा लाभ घेता येणार आहे..

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) in 2025.The following are the main treatments included in this scheme

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत संपूर्ण शासकीय रुग्णालयांमध्ये या सेवा अंतर्गत 771 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश असणार आहे सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे सेवा व उपचार असणार आहे

सर्वसाधारण शस्त्रक्रिया

  • कान नाक घसा नेत्ररोग स्त्रीरोग प्रस्तुति शास्त्र अस्थिरोग पोट जठार कार्डिओ बाळ रोख शस्त्रक्रिया प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया तसेच जनरल सर्जरी
         ईएनटी (ENT) सर्जरी
        नेत्ररोग शस्त्रक्रिया (Ophthalmology Surgery)
         स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र शस्त्रक्रिया (Gynecology and Obstetrics Surgery)
        ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया (Orthopedic Surgery)
        कार्डियाक व कार्डिओथोरेसिक शस्त्रक्रिया (Cardiac and Cardiothoracic Surgery)
        बालरोग शस्त्रक्रिया (Pediatric Surgery)
         प्लास्टिक सर्जरी
         न्यूरोसर्जरी
        सर्जिकल ऑन्कोलॉजी (Surgical Oncology)
         युरोलॉजी (Genitourinary Surgery)
         गॅस्ट्रोएंटरोलॉजी शस्त्रक्रिया (Surgical Gastroenterology)
  •     * जनरल मेडिसिन
        * कार्डिओलॉजी
        * नेफ्रोलॉजी
        * न्यूरोलॉजी
        * एंडोक्रिनोलॉजी
        * गॅस्ट्रोएंटरोलॉजी
        * पल्मोनोलॉजी
        * डर्मेटोलॉजी
        * रूमेटोलॉजी
        * इन्फेक्शिअस डिसीजेस (Infectious Diseases)
        * बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन (Pediatric Medical Management)
        * मानसिक विकार
    * **कर्करोग उपचार (Cancer Treatment):**
        * मेडिकल ऑन्कोलॉजी (Medical Oncology)
        * रेडिएशन ऑन्कोलॉजी (Radiation Oncology)
    * **इतर उपचार:**
        * बर्न्स (Burns)
        * पॉलीट्रॉमा (Polytrauma)
        * प्रोस्थेसिस आणि ऑर्थोसिस
        * क्रिटिकल केअर
        * इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी
        * हिमोडायलिसिस (Kidney Dialysis)

सुमारे 971 शस्त्रक्रिया/उपचार आणि 121 फॉलो-अप प्रक्रियांचा समावेश आहे.
प्रति कुटुंब प्रति वर्ष ₹1.5 लाख पर्यंत संरक्षण किडनी प्रत्यारोपणासाठी ₹2.5 लाख पर्यंत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पूर्वीचे आजार देखील समाविष्ट आहेत.
डिस्चार्ज नंतर 10 दिवसांपर्यंत औषधे आणि तपासणी खर्चाचा समावेश आहे.

Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana

Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana विम्याचा हप्ता कोण देणार..

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चा विमा  हप्ता लाभार्थी कुटुंबासाठी विम्याचा हक्क हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येतो.

2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana listed hospital name… या योजनेतील रुग्णालयांची यादी.

या योजनेतील शासकीय व निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयाची 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या निकषावरून करण्यात आली आहे लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रुग्णालयात त्यांच्या जवळच्या असणाऱ्या रुग्णालयात उपचार करून घेऊ शकतो.

Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana या योजनेची फी किती आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास ही निशुल्कवैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. ती पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैद्य शिधापत्रक पिवळी अत्योदय अन्नपूर्णा व केसरी व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालया मधून उपचार राहणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये सातबारा उतारा, फोटो ओळखपत्राच्या, आधारे अंगीभुत रुग्णालया मधून उपचार हा अनुनेय राहणार आहे.

Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana

वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयाचा उपचार निदान आवश्यक औषधोपचार व भोजन तसेच एका वेळेचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये समावेश करून दिला जाणार आहे, त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसापर्यंत चा सर्व पॅकेज यामध्ये समाविष्ट आहेत.

आरोग्य मित्र.

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णाची नोंदणी उपचारादरम्यान सहाय्यक तसेच मार्गदर्शक करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे, प्रत्येक अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र हे उपलब्ध असणार आहेत.

आरोग्य शिबिर.

या योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अंगीकृत रुग्णालयामार्फत ही योजना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या शिबिरात रुग्णाची तपासणी करून दिली जात असते, तसेच या योजनेतील 971 उपचारापैकी सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावरील योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. 





7 thoughts on “Updated 2025 Mahatma Jyotiba fule Jan aarogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना”

  1. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही खरोखरच गरजू लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यात मोठ्या प्रमाणातील आरोग्य सेवा देण्यात येत आहेत, हे फारच चांगले आहे. म्हणजे, अशा योजना असल्याने खरोखरच गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्य सेवा मिळणे शक्य होऊ शकते. पण मला काही गोष्टी स्पष्ट कराव्या वाटतात, उदाहरणार्थ, ही योजना सुरू करण्याचा खर्च किती आहे? आणि शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा, डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध आहे का? याची चौकशी करणं किती कठीण असेल? तसेच, या योजनेमुळे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेचा गुणवत्तेचा स्तर कसा टिकवला जाईल? आपले काय मत आहे?

    Reply
  2. ही योजना खरोखरच गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी एक मोठी मदत आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे असे वाटते. या योजनेमुळे अनेक लोकांना वैद्यकीय सेवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण आणि इतर महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे. पण अशी एक गोष्ट मला समजत नाही, की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया किती सोपी आहे? शिवाय, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत असेल का? तुमच्या मते, या योजनेचा लाभ खरोखरच सर्वांपर्यंत पोहोचतो का?

    Reply
  3. अतिशय चांगली योजना आहे ही, विशेषत: गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय खरोखरच प्रशंसनीय आहे. या योजनेमुळे अनेक लोकांना आरोग्यसेवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मला वाटते की अशा योजना इतर राज्यांनीही लागू केल्या पाहिजेत. माझ्या मते, ही योजना खरोखरच समाजाच्या पायाभूत गरजा पूर्ण करणारी आहे. पण मला एक प्रश्न पडतो, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत आहे का? तुमच्या मते, या योजनेचा लाभ खरोखरच सर्वांपर्यंत पोहोचतोय का?

    Reply
  4. ही योजना खरोखरच गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी एक मोठी मदत आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय खूपच प्रशंसनीय वाटतो. या योजनेमुळे अनेक लोकांना वैद्यकीय सेवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण आणि इतर महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच, ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे, हेही एक चांगले पाऊल आहे. पण मला एक प्रश्न पडतो, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत आहे का? आणि ही योजना इतर राज्यांसाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे का?

    Reply
  5. मराठी
    ही योजना खरंच प्रशंसनीय आहे, विशेषत: गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी. महागड्या आरोग्य सेवांमुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा फरक पडू शकतो. पण काही प्रश्न मनात येतात. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही अडचणी येत आहेत का? शासकीय रुग्णालयांमध्ये सेवांची गुणवत्ता कशी आहे? शेतकरी आणि गरीब कुटुंबांना ही योजना किती प्रमाणात मदत करते? मला असे वाटते की, अशा योजनांमुळे समाजाच्या पायाभूत गरजा पूर्ण होतात, पण त्याचबरोबर सेवांची गुणवत्ता आणि पारदर्शकता ही महत्त्वाची आहे. तुमच्या मते, या योजनेत सुधारणे करण्यासाठी काय करता येईल?

    Reply
  6. पाठातील माहिती खूपच महत्त्वाची आहे, विशेषत: गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी. महाराष्ट्र सरकारची ही योजना खरोखरच प्रशंसनीय आहे, कारण ती आरोग्यसेवा सर्वांना सुलभ करते. या योजनेमुळे शेतकरी आणि गरीब कुटुंबांना मोठ्या आरोग्य खर्चापासून मुक्तता मिळेल. तसेच, शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतींनी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला एक प्रश्न पडतो: या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचणी येत आहेत का? आणि ही योजना इतर राज्यांसाठीही उपयुक्त ठरेल का? तुमच्या मते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी काय सुधारणा करता येईल?

    Reply

Leave a Comment