MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक भूखंड, गुंतवणूक आणि सुविधा. 

Table of Contents

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा एक महाराष्ट्र राज्य सरकारचा विभाग आहे. भारत सरकारने 1962 मध्ये व्यवसायासाठी चालला देण्यासाठी आणि लहान उद्योजकांना एकाच जागेवरती मूलभूत सुविधा मिळावे यासाठी एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची एक संस्था स्थापन केली आणि ह्या संस्थेत माध्यमातून संपूर्ण औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली . एमआयडीसी च्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आवश्यक असलेली जमीन पायाभूत सुविधा जसे की लाईट पाणी वीज पुरवठा रस्ते पथदिवे ड्रेनेज यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.

MIDC महाराष्ट्र: शोधा औद्योगिक भूखंड आणि उपलब्धता!

एमआयडीसीच्या माध्यमातून राज्य सरकार हे आपल्या राज्यातील नागरिकांसाठी उद्योग आणि रोजगाराची निर्मिती करते ज्याच्या माध्यमातून आयटी पार्क फूड पार्क एक्साइल पार्क अशा अनेक व्यवसायांना देश विदेश देशातील गुंतवणुकींना आकर्षित करण्यासाठी आणि एकाच खिडकीमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि याच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार निर्मिती ही त्यांच्या गाव पातळीवर करण्यासाठी भर देण्यात आला,या विभागामार्फत राज्य एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी त्याला MIDC Polt मध्ये योग्य जागा मिळवून देणे.व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरण तयार करणे, व्यवसायासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा, उदाहरणार्थ लाईट, पाणी, रस्ते, आणि दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणे.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक भूखंड, गुंतवणूक आणि सुविधा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत अनेकांनी त्यांच्या स्वप्नांना भरारी देऊन , व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे अनेकांना स्वस्तात जागा , सवलतीत वीज , आणि इतर फायद्याच्या जोरावर उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आहे. MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामुळे अनेकांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न खरे ठरले आहे अनेक अडचणी समस्या अडथळे यामधून अनेक राज्यांमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती मध्ये वाढ झाली आहे. तुम्हालाही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यासाठी जर का तुम्हाला एमआयडीसीमध्ये जागा किंवा भूखंड किंवा शेड किंवा गाळा हवे असेल तर खालील संपूर्ण प्रक्रिया दिली आहे की तपासा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या उद्योजक बना.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्लॉट/ शेड / गाळा  MIDC  वाटप प्रक्रियेसाठी कोण अर्ज करू शकतो ?

1 )  भारताचा नागरिक .
2 ) प्रायव्हेट किंवा लिमिटेड. कंपनीचे प्रस्तावित प्रवर्तक ( कंपनी भाडेपट्टी / भाडेपट्टी कराराच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत स्थापना करावी )
3) सहकारी संस्थेचे प्रस्ताविक प्रवर्तक.
4 ) नोंदणीकृत भागीदारी संस्था.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  प्लॉट/ शेड / गाळा   वाटप प्रक्रियेसाठी काय आहे ? आवश्यक कागदपत्रे ?

1 ) सर्वप्रथम तुम्हाला प्लॉट / शेड / गाळा यापैकी जे पाहिजे ते ठरवले गेले पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला प्लॉट /मिळवण्यासाठी किंवा गाळा किंवा शेड यासाठी अर्ज करावा लागेल, हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात असतो .
सर्वप्रथम अर्जाची छाननी होते , त्यानंतर भूखंड वाटप समितीची बैठक होऊन , त्यामध्ये भूखंड वाटप यासाठी लॉटरी पद्धत अवलंबली जाते, त्यामध्ये लॉटरी मध्ये ज्या संस्थेचे / नागरिकाचे कंपनीचे नाव येईल अशा संस्थेलाऊ कंपनीला तो प्लॉट ( Alot ) अलोकेट केला जातो.


2 ) ऑनलाइन अर्जामध्ये  सविस्तर प्रकल्प अहवाल ( DPR ) यात मागणी केलेले क्षेत्रफळ व त्याची आवश्यकता ( बिल्टप क्षेत्रासह  ) एकूण भांडवल व त्याची उपलब्धता (खेळत्या भांडवलासह ) कच्चामाल पुरवठा , विक्री , व्यवस्थापन , निर्माण होणारा रोजगार , वीज , पाणी आवश्यकता इत्यादी माहिती भरावी , अनुभव सुद्धा नमूद करावा लागतो.
3) कंपनी भागीदारी संस्था नोंदणी प्रमाणपत्रासह.   On line mE Memorandum and Article of Association/Partnership deed.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – अनलॉक करा औद्योगिक भूखंड,


प्राधान्य सदराखाली भूखंड वाटपासाठी ( Priority  Allotment of Plots ) यामध्ये राज्य सरकार आपल्या जवळ देशातील मोठे उद्योग व्यवसाय विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा संरक्षण क्षेत्रातील कंपनी मोठ्या खाजगी कंपनी मोठ्या कंपन्यांचा विस्तार करण्यासाठी हे प्लॉट राखीव ठेवतात यासाठी अतिरिक्त माहिती उदाहरणात – परकीय गुंतवणुकीबाबतची माहिती , शासनमान्य विशाल प्रकल्प मान्यतेच्या पत्राची प्रत, इत्यादी अर्जामध्ये सांगावी लागते.
Online अर्जात नमूद केलेल्या जागेच्या ( क्षेत्रफळाच्या ) वापराचा तपशील व त्याप्रमाणे प्रस्तावित बांधकामाचा नकाशा ( Block Plan ).


अर्जदारास यापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाटप केलेल्या भूखंडाची माहिती व त्या भूखंडाच्या वापराचा तपशील. ( पहिला भूखंड असताना दुसरा भूखंड पाहिजे असेल तर ).
अर्जात व प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे पाण्याचा वापर, प्रदूषण नियंत्रणाचे बांधकाम, रोजगार निर्मिती, उत्पादन चालू करण्यासंबंधी अंदाजे कालावधी, इत्यादी नमूद केलेल्या बाबींची पूर्तता केली जाईल याबाबतची हमीपत्र ( Duly Notarized ).
विहित प्रक्रिया शुल्काचा धनादेश.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

कालावधी..

सदर योजनेअंतर्गत वाटप समितीची बैठक होऊन सदरचे ऑफर पत्र ( Allotment letter ) हे दोन दिवसात दिले जाते.
प्लॉट शेड गाळा वाटपाची जाहिरात प्रत्येक वर्षी जाहीर केले जाते वर्षातून साधारणता तीन ते चार वेळा अशी जाहिरात प्रसिद्ध केल्या जातात, त्या संदर्भात संपूर्ण माहिती ही MIDC संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, सर्वसाधारणपणे जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध होतात आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला  प्लॉट / शेड / गाळा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.

लहान आणि मध्यम उद्योग व्यवसायासाठी..

याची निविदा प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे यामध्ये लहान आणि मध्यम अशा गुंतवणूकदारांसाठी आणि उद्योग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मोठ्या उद्योग का बरोबरच लहान उद्योगांचे महत्त्व टिकवण्यासाठी यांचे प्लॉट राज्य सरकार कडून राखिव केले जातात. यामध्ये Plot/ Shop निविदा निघते.याची जाहिरात MIDC संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाते यामध्ये Plot शोधता येतो तसेच ॵध्योगिक , रहिवासी, आणि वाणिज्य वापरासाठी वाटप केले जाते.

MIDC POLT साठी अर्ज कुठे करावा..

सह मुख्य कार्यकारी अधिकारी उद्योग सार्थी मरोळ औद्योगिक क्षेत्र महाकाली लेणी रोड अंधेरी पूर्व मुंबई 400093.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे अधिकारात प्लॉट वाटप अधिकार मर्यादा ,
30,001 चौ.मी. पेक्षा अधिक क्षेत्र असलेला व सर्व प्रकारच्या एमआयडीसी क्षेत्रात येणारा प्लॉट औद्योगिक रासायनिक कारखाना वापरासाठी नसलेला राज्याच्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात येणारा प्लॉट ( सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली भूखंड वाटप संमितीचे मंजुरीने )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्योग सारथी मुरुड औद्योगिक क्षेत्र महाकाली लेणी रोड अंधेरी पूर्व मुंबई 400093.

15,000 चौ.मी. ते 30,001 चौ. मी. पर्यंत शेत्र असलेल्या प्लॉट साठी ( MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूखंड वाटप समितीचे मंजुरीने )

प्रादेशिक अधिकारी संबंधित MIDC  कार्यक्षेत्रातील.

15,000 चौ. मी. पर्यंत शेत्र असलेल्या प्लॉटसाठी ( MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूखंड वाटप समितीचे मंजुरीने )

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पर्यावरण पूरक उद्योगाकरिता 

संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केली असेल आणि मंजूर नकाशा असेल तर पंधरा दिवसांमध्ये वाटप केली जाऊ शकते.

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वाढीव जागेचे वाटपासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ?

परिशिष्ट अ  नमुना प्रमाणे विहित नमुन्यातील अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
1 अर्ज
2 उद्योग विस्ताराचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( DPR )
3 मूळ भूखंडाच्या जागेचा केलेला वापर आणि उद्योग विस्तारासाठी मागणी केलेल्या जागेचा वापर दर्शवणारा प्रमाण नीत केलेला एकत्रित नकाशा ( Block Plan )
4 मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण झालेली वार्षिक अहवाल.
5 मूळ भूखंडावरील उत्पादित मालासाठी प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीच्या प्रमाणित प्रती. ( Order in hand )
6  मूळ भूखंडावरील उद्योगासाठी प्राप्त केलेले EM Part -II/IEN Part-B ची प्रत.
7 औद्योगिक परवाना प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )
8 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र ( Consent Operate ) .
9  कारखाना उत्पादनात गेले चे दर्शवणारी कागदपत्रे ( उदा. मागील सहा महिन्यातील वीज बिल, प्रोडक्शन अँड सेल्स अबस्ट्रॅक, एक्साईज रजिस्टर अबस्ट्रॅक इत्यादी.
10 विहित प्रक्रिया शुल्काचा धनादेश.


3 thoughts on “MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक भूखंड, गुंतवणूक आणि सुविधा. ”

  1. MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अनेक उद्योजकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. या संस्थेमुळे लहान आणि मध्यम उद्योगांना पायाभूत सुविधा सहजपणे उपलब्ध होतात. अनेक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या करिअरला चालना मिळाली आहे. MIDC च्या माध्यमातून उद्योगक्षेत्रातील विकासाला चालना मिळत आहे. तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी MIDC मध्ये जागा कशी मिळवता येईल?

    Reply

Leave a Comment