Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना.

50 लाखापर्यंत कर्ज Mukhymantri rojgar nirmiti Yojana ही राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यातील विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन राज्याची महत्त्वकांक्षी अशी स्वतंत्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून शासनाच्या नवीन औद्योगिक धोरण 2019 मुद्दा क्रमांक 5 (II) 9.2 नुसार सुरू झाली आहे.

आता उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत नोकरी नसणाऱ्या अनेक तरुण तरुणींना आता महाराष्ट्र सरकार च्या मदतीने व्यवसाय सुरू करता येणार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 लाखा पर्यंत ची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana

जे तरुण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु भांडवलाच्या अभावी ते व्यवसाय करू शकत नाही अशा संपूर्ण उद्योजकांना एक सुवर्णसंधी शासनाच्या माध्यमातून आता मिळणार आहे, आता शासनाच्या वतीने बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देऊन महा रोजगार निर्मिती करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री रोजगार योजनेचे महत्त्वपूर्ण टप्पे.

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana आर्थिक मदतीचे स्वरूप व प्रकल्प मर्यादा.

1 . उत्पादन प्रक्रिया उद्योग रक्कम 50 लाख
2 . सेवा उद्योग कर्ज मर्यादा रक्कम 20 लाख

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची नियम व अटी.

1 ) अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे.
2) अधिकतम वयोमर्यादा 45 वर्ष.
3) अनुसूचित जाती जमाती महिला ओबीसी इतर मागास प्रवर्ग व अपंग तसेच माजी सैनिक यांच्यासाठी वयोमरते देत पाच वर्ष शिथिलता राहील.
4) अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
5) अर्जदार केवळ नवीन उद्योजक किंवा कारागीर संस्था व बचत गट योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
6) शैक्षणिक पात्रता दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण व 25 लाखावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण.
7) एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल. ( कुटुंबाची व्याख्या ही पती-पत्नी अशी असेल )
8) सदर योजनेतून कर्ज मंजूर केल्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेकडून ईडीपी प्रशिक्षण उत्पादन प्रवर्गातील उद्योगासाठी दोन आठवडे मुदतीचे व सेवा व कृषी पूरक उद्योगासाठी एक आठवडा मुदतीचे असेल.

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची यादी.

१) फोटो
२) आधार कार्ड
३) शैक्षणिक दाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट
४) जातीचे प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती जमाती माजी सैनिक अपंग इत्यादी )
५) लोकसंख्येचा दाखला ग्रामसेवकाचा
६) प्रकल्प अहवाल
७) विहित नमुन्यातील इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म
८) पॅन कार्ड
९) गुणपत्रिका
१०) REDP/ EDP/ SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र.
११) पार्टनरशिप उद्योग असेल तर

  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • अधिकार पत्र घटना
  • अधिकार पत्र
  • घटना
Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana

संस्थेसाठी व बचत गटासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे..

१) १९६० कायद्यान्वये संस्था रजिस्टर नोंदणी प्रमाणपत्र.
२) संस्थेचा ठराव
३) संचालक मंडळाची यादी चेअरमन व सचिव यांचे फोटो वित्तीय संस्था बँक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्य बोल समितीच्या मंजुरीने संबंधित बँकाकडे कर्ज मंजुरीसाठी शिफारस करण्यात येते सरकारी बँका तसेच खाजगी क्षेत्रातील शेडूल बँका – येस बँक , एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादी प्रमुख बँका सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे.

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी थोडक्यात.

  • योजनेचे कार्यक्षेत्र – संपूर्ण महाराष्ट्र
  • योजनेचे निकष –
  • 1) प्रकल्प रुपये 10 ते 25 लाखासाठी सातवी पास.
    2) प्रकल्प रूपये 25 ते 50 लाख साठी दहावी पास.

  • उत्पादन उद्योग :- कमाल प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये.

  • सेवा उद्योग :- कमाल प्रकल्प मर्यादा 10 लाख रुपये.

  • प्रकल्प अहवाल खालील विहित निकषावर आधारित असणे आवश्यक आहे.

  • स्थिर भांडवल – मशीनरी रक्कम कमीत कमी 50%

  • इमारत बांधकाम – जास्तीत जास्त 20%

  • खेळते भांडवल- जास्तीत जास्त 30% टक्के

  • स्वगुंतवणूक – 5%. ते 10%

  • अनुदान मर्यादा- 15% ते 35%

  • सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे.

  • पात्र मालकी घटक :- वैयक्तिक, भागीदार , बचत गट.
Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्रे.

१) पासपोर्ट साईज फोटो
२) आधार कार्ड
३) पॅन कार्ड
४) जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला/डोमीसीएल सर्टिफिकेट.
५) शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र.
६) हमीपत्र( अंडरटेकिंग फॉर्म ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल
७) प्रकल्प अहवाल
८) जातीचे प्रमाण.
९) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र.
१०) कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र.
११) पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र अधिकार पत्र घटना

टिप:

वरील कागदपत्रांमधील अनुक्रमांक एक ते चार हे तीनशे केबी पर्यंत व अनुक्रमे पाच आणि सहा ते केबी पर्यंत असावी.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ https://mahacmegp.gov.in सदर संकेत स्थळाला भेट द्यावी व आणि संकेतस्थळावर अर्ज दाखल करावे.

Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत येणारे काही उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योगाची यादी.

  • रेड बॉल आणि उलन बॉलिंग लॅचि बनवणे.
  • फॅब्रिक्स उत्पादन
  • लॉन्ड्री
  • बारबर
  • प्लंबिंग
  • डिझेल इंजिन पंप
  • ईटीसीसी ची दुरुस्ती
  • स्प्रेयर साठी टायर व्हॅलसीनीझिगं युनिट एग्रीकल्चर सर्विसेस
  • बॅटरी चार्जिंग
  • आर्ट बोर्ड पेंटिंग / स्प्रे पेंटिंग
  • सायकल दुरुस्तीची दुकान
  • बँड पथक
  • मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्ती
  • इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती
  • ऑफिस प्रिंटिंग आणि बांधणी
  • काटेरी तारजे उत्पादन
  • अनुकरण ज्वेलरी बांगड्या बनविणे
  • स्क्रू बोल बेरिंग चे मॅन्युफॅक्चरिंग
  • वर्कशॉप
  • स्टोरेज बॅटरी चे मॅन्युफॅक्चरिंग
  • हॅन्डमेड यु टेस्ट ऑफ कॉपर उत्पादन
  • रेडिओचे उत्पादन.
Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana
  • मोटार पंप जनरेटर उत्पादन
  • कॉम्प्युटर असेंबली
  • वेल्डिंग वर्क
  • प्लॅटफॉर्म स्केल्स
  • विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
  • मशिनरीचे सुट्टे भाग बेरिंग इत्यादी मॅन्युफॅक्चरिंग
  • मिक्सर ग्राइंडर आणि इतर घराच्या वस्तू बनवणे
  • प्रिंटिंग प्रेस
  • बॅग उत्पादन
  • मंडप डेकोरेशन
  • कॉटन बेड उषा
  • झेरॉक्स सेंटर
  • चहा स्टॉल
  • मिठाचे उत्पादन
  • होजिअरी उत्पादन
  • रेडीमेड गारमेंट टेलरिंग
  • खेळणी बाहुली बनवणे
  • डिझेल इंजिन पंप दुरुस्ती
  • मोटर रिवाइंडिंग
  • वायर नेट बनवणे
  • पेपर पिन चे उत्पादन
  • हर्बल सुंदर पार्लर
  • आयुर्वेदिक हर्बल उत्पादने
  • केबल टीव्ही नेटवर्क संगणक केंद्र
  • पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस
  • सिल्क साड्याचे उत्पादन
  • रसवंती
  • मॅट बनविणे
  • आटा चक्की
  • कप बनवणे
  • वूड वर्क
  • स्टील ग्रील मॅन्युफॅक्चर
  • जिम सर्विसेस
  • फोटो फ्रेम
  • पेप्सी युनिट कोल्ड सॉफ्ट ड्रिंक
  • खवा युनिट
  • डाळ मिल
  • मिनी तांदूळ सिलिंग राईस मिल
  • कॅण्डल उत्पादन
  • बर्फ कॅन्डी चे मॅन्युफॅक्चरिंग
  • शाम्पू उत्पादन
  • केसाच्या तेलाची निर्मिती
  • पापड मसाला उद्योग
  • बेकरी प्रॉडक्ट
  • पोहा उत्पादन
  • बेदाणा मनुका उत्पादन
  • ज्वेलरी वर्क
  • स्टोन क्रशर व्यापार
  • स्टोन कटिंग पॉलिशिग

सदर योजनेअंतर्गत आपणास महाराष्ट्रतील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येईल

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा..

https://maha-cmegp.gov.in सदर संकेत स्थळाला भेट द्यावी ..

8 thoughts on “Mukhymantri Rojgar Nirmiti Yojana मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना.”

  1. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना खरोखरच एक उत्तम उपक्रम आहे. ही योजना तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप मदत करेल. भांडवलाच्या अभावी व्यवसाय सुरू करू शकत नसलेल्या तरुणांना ही योजना एक सुवर्णसंधी देते. पण अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया किती सोपी आहे? या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत आहे का? शासनाने या योजनेच्या प्रचार-प्रसारावर अधिक लक्ष द्यावे असे वाटते. तुमच्या मते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी कोणते सुधारणा करता येईल?

    Reply
  2. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तरुणांसाठी खरोखरच एक उपयुक्त उपक्रम आहे. भांडवलाच्या अभावी व्यवसाय सुरू करू शकत नसलेल्या तरुणांना ही योजना प्रोत्साहन देते. पण अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे का? या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत आहे का? शासनाने या योजनेच्या प्रचार-प्रसारावर अधिक लक्ष द्यावे असे वाटते. तुमच्या मते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी कोणते सुधारणा करता येईल?

    Reply
  3. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही खरोखरच तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. या योजनेमुळे अनेक तरुण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. भांडवलाच्या अभावी व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांना ही योजना खूप मदत करेल. पण अर्ज करण्याची प्रक्रिया किती सोपी आहे हे मला माहित नाही. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येत आहे का? शासनाने या योजनेच्या प्रचार-प्रसारावर अधिक लक्ष द्यावे असे मला वाटते. तुमच्या मते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी कोणते सुधारणा करता येईल?

    Reply

Leave a Comment