Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण

Nari tu narayani mahila sakshimikar Yojan नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण ही योजना भारत सरकारने 15 जुलै 2019 संपूर्ण भारतामध्ये लागू केली, या योजनेची घोषणा भारत सरकार मध्ये असलेल्या वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी त्यांच्या पहिल्या बजेटमध्ये  जाहीर केली. या योजनेचा मुख्य हेतू हा महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरण करणे हा होता. योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवणे त्यांच्यासाठी रोजगाराची निर्मिती वाढवणे.

Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan

1 लाखापर्यंत कर्ज पंतप्रधान मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून आणि जनधन खात्याच्या माध्यमातून ओरड्राची सुविधा महिलांसाठी ही खास आकर्षण असणारी योजना केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांनी जाहीर केली.

भारत सरकारचे बजेट 2019 20 मध्ये ज्यावेळेस ही योजना बजेटमध्ये जाहीर केली त्यावेळेस केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी श्री स्वामी विवेकानंद यांच्या लिखाणाचे वर्णन करताना असे म्हटले होते की जोपर्यंत महिलांची स्थिती ही सुधारत नाही तोपर्यंत विश्वाचं कल्याण होणार नाही.

नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण योजनेचे मुख्य हेतू हा ग्रामीण भागातील असणाऱ्या कमजोर महिला आर्थिक आणि मागासलेल्या महिलांना लाभ देणे, त्यांना समाजामध्ये योग्य स्थान मिळवून देणे, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून प्रोत्साहन केले जाते त्यांना एकत्रित आणले जाते आणि योजनेच्या माध्यमातून त्यांना सक्षम केले जाते.

Nari tu narayani mahila sakshimikar नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण योजनेचे ठराविक पैलू.

  • 1 भारतात प्रथमच प्रत्येक 1000 पुरुषामागे 1020 महिला संख्या बनली आहे.
  • 2 प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 9.6 कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले.
  • 3 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.724 शौचालय बांधले यामध्ये महिलांचे विशेष प्राधान्य होते.
  • 4 स्टॅन्ड अप इंडिया च्या लाभार्थ्यापैकी 81% टक्के महिला आहेत.
  • 5 प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत 27.6 कोटी महिला लाभार्थ्यांना कर्ज मिळाले.
  • 6 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 3.03 कोटी महिलांना मदत.
  • 7 महिलांसाठी खास 26 आठवड्यांची सशुल्क प्रस्तुती रजा.
Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan

Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण ही योजनेअंतर्गत लाभ.

1)   वित्तीय सहाय्यता – या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या जनधन खात्यामध्ये 5,000/- पाच हजार रुपये ची ओव्हर ड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे

2 )  1,00,000/ एक लाख रुपये पर्यंत कर्जाची मर्यादा ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे.

Nari tu narayani mahila sakshimikar नारी तू नारायणी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराची निर्मिती करता येऊ शकते, यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते ,आणि त्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकते.

योजनेच्या माध्यमातून महिलांचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यास खूप मदत होणार आहे.

महिलांना समाजामध्ये रोजगार निर्मिती करण्यापासून उद्योग व्यवसायापर्यंत आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी भारत सरकारचा विशेष प्रयत्न आहेत त्यासाठी अशा योजनेच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन करणे योजनेचा लाभ देणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे हा मुख्य आहे.

Nari tu narayani mahila sakshimikar योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे  –

  • ओळखपत्र साईज फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • रहिवाशाचा पुरावा
  • ITR असतील तर

Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan नारी तू नारायणी यांचा अर्थ –

भारत सरकारने जेव्हा ही योजना लागू करण्याचे ठरवली त्यावेळेस या योजनेला नाव देताना खूप विचार करण्यात आला आणि त्यावेळेस नारी तू नारायणी हे नाव निवडण्यात आले याचा अर्थ ( स्त्री तू देवी आहेस ) आपल्या भारत देशामध्ये सनातन धर्मामध्ये स्त्रीला देवी समान मानण्यात आले आहे, त्यामुळे महिलांची स्थिती सुधारायची नावश्यक आहे.

Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan

या योजने अंतर्गत भारत सरकारने आपल्या अर्थसंकल्पात पुढे जाण्यासाठी सरकारी आणि खाजगी भागधारकांसह एक समिती स्थापन केली आहे , महिला स्वयंसेवा गट यांना नाबार्ड आणि आरबीआय ने 1992 मध्ये सादर केलेल्या भारतीय सूक्ष्म वित्त मॉडेल च्या माध्यमातून कमी व्याज आकारणी जनधन बँकेच्या माध्यमातून पाच हजार रुपये पर्यंत सुविधा आणि पंतप्रधान मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य प्रत्येक बचत गटातील एका महिन्याला एक लाख रुपये पर्यंत कर्जासाठी पात्र ठरवणे.

Nari Tu Narayani Mahila Sakshimikar Yojan नारी तू नारायणी या योजनेअंतर्गत भारत सरकारने खूप उपक्रम राबविले त्यांची यादी.

  • सुकन्या समृद्धी योजना
  • प्रधानमंत्री उज्वला योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना
  • प्रधानमंत्री बेटी बचाव बेटी पढाव योजना
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
  • सौभाग्य योजना
  • पंतप्रधान उजाला योजना
  • किशोरी सबला योजना
  • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवजोती अभियान
  • बेबी केअर किट योजना
  • मोफत शिलाई मशीन योजना
  • महिला समृद्धी योजना MSY

Leave a Comment